कै. गाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त उपळवटे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप - Saptahik Sandesh

कै. गाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त उपळवटे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – आज(दि.५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे (ता.माढा) येथे कै.नागनाथ रामचंद्र गाडे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (मोठी वही,पेन ,व पेन्सिल प्रत्येकी एक), छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज ,महात्मा फुले भारतीय संविधान यांच्या प्रतिमा व मुलांना खाऊ चे वाटप अभिमन्यू गाडे यांच्या कडून देण्यात आले.

या वेळी उपळवटे गावाचे माजी उपसरपंच प्रकाश नाना खूपसे, अमोल गायकवाड, प्रतीक गायकवाड, दयानंद गायकवाड, शैलेश गाडे, अनिल जाधव, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी प्रकाश नाना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांचा शाळेतर्फे सन्मान करण्यात आला.शैक्षणिक साहित्य व खाऊ मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थी आनंदित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!