जिल्हा व तालुका विधी सेवा समितीच्यावतीने करमाळ्यातील मुकबधीर विद्यालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिन” साजरा…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व तालुका विधी सेवा समिती, करमाळा तसेच करमाळा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता.१०) करमाळा शहराजवळील श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मुकबधीर विद्यालयात “जागतिक मानसिक आरोग्य दिन” साजरा करण्यात आला.
याप्रसंगी हा कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायधीश एस.ए.ए.आर औटी यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा एम.पी.एखे तसेच सह.दिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांचे उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट न्यायाधीश एम.पी.एखे व न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी घेवून त्यांच्याशी संवाद साधला व फळे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा एम.पी.एखे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.पी.बी.जाधव, सचिव ॲड.वाय.ए.शिंपी, ॲड.एम.डी.कांबळे, ॲड.आकाश मंगवडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्य व शिक्षकांनी आभार व्यक्त केले.