करमाळा भाजपाच्यावतीने 'कोजागिरी'निमित्त तब्बल ८०० लीटर दुधाचे मोफत वाटप - Saptahik Sandesh

करमाळा भाजपाच्यावतीने ‘कोजागिरी’निमित्त तब्बल ८०० लीटर दुधाचे मोफत वाटप

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने करमाळ्यातील सुभाष चौक येथे ९ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता मोफत दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, यावेळी गरजु व गरीब नागरिकांना तब्बल ८०० लीटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी दिली.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांना दुधाचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने ‘भारतीय जनता पार्टी, करमाळा’च्या वतीने सुभाष चौक येथे दरवर्षी गरजुंना मोफत दुध वाटप केले जाते.या कार्यक्रमास दरवर्षी मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी तब्बल ८०० लिटर दुध वाटपाचे नियोजन केले होते, हे दुध करमाळा शहरातील विविध भागातील तरुणांना तसेच गरजू नागरिकांना वाटप केले गेले. या दूध वाटप कार्यक्रमाची सुरुवात करमाळा शहराचे साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जगदाळे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे यांच्या हस्ते करण्यात आली.

या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, घनश्याम गांधी, माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण, राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब कुंभार, महेश परदेशी, प्रदीप देवी, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, नरेंद्रसिंह ठाकुर, भाजपा व्यापारी आघाडी शहराध्यक्ष जितेश कटारिया, श्याम सिंधी, लखमीचंद हासीजा, गोपाल वाघमारे, मनोज मुसळे, संजय जमदाडे, पंकज सोळंकी, अजय सुरवसे, सचिन कणसे, रवीराज पठाडे, मिलिंद माने, संभाजी माने, कुणाल पाटील ब्रिजेश देवी, अवी माने, कपिल मंडलिक, मनोज कुलकर्णी , बाळासाहेब कारंडे, सुरज गोरे, संदीप ननवरे, विशाल बनकर, अजित जागते, बाळासाहेब दीक्षित, दिनेश पंडित, महिला शहर आघाडीच्या शहराध्यक्षा संगीताताई नष्टे, चंपावती कांबळे, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा अश्विनी भालेराव, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!