राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.. - Saptahik Sandesh

राजमाता आहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : राजमाता पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाज करमाळा यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात रक्तदान शिबिर, खाऊ वाटप, सरबत वाटप, फळे वाटप, चारा वाटप, पाणपोई व वृक्षारोपणसह करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचा उपक्रम 31 मेपासून 2 जूनपर्यंत राबवण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अशी माहिती रासपचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी दिली. राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती 31 मे रोजी असल्याने सकाळी साडेनऊ वाजता करमाळा बायपास रस्त्यावरील जोगेश्वरी मिसळ परिसर येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते पूजन केले जाईल. तर सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

1 जून रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप व पांजरपोळ गोशाळा येथे चाऱ्याचे वाटप केले जाणार आहे, तसेच नालबंद मंगल कार्यालय परिसरातील मदरसा उर्दू शाळेत खाऊ वाटप नियोजन करण्यात आले आहे. तर 2 जून रोजी राजमाता भवन बाह्यवळण रस्ता निलज रोड परिसरात पाणपोई व वृक्षारोपण तसेच सायंकाळी पाच वाजता राजमाता भवन बाह्यवळण रस्ता निलज रोड येथे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे व नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!