केम येथे श्री संत बाळू मामा यांच्या पालखी सोहळयाला उत्साहात सुरूवात
केम (संजय जाधव) – केम येथे श्री संत बाळू मामा यांच्या पालखी सोहळयाला मोठया उत्साहात सुरूवात झाली. २७ जुलै रोजी बाळू मामा यांच्या पालखीचे आगमण निमोणी मळयातील खंडोबा मंदिर येथे आगमन झाले.
केममध्ये या पालखीचा सात दिवस मुक्काम आहे. या पालखी सोहळयाबरोबर मेंढ्या सुध्दा आहेत. सकाळी नित्यनेमाणे श्री संत बाळू मामा यांची आरती होते. याआरती साठी केम व परिसरातील भाविक मोठया प्रमाणावर हजेरी लावत असतात. आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. तसेच भाविक दिवसभर मेंढ्या राखण्याची सेवा करतात. सायंकाळी सात वाजता पालखी समोर कीर्तन होते. रात्री ९ वा आरती केली जाते. त्यानंतर महाप्रसाद वाटप केला जातो.
सध्या संपूर्ण खंडोबा मंदिर परीसर बाळू मामाच्या नाम घोषाने दुमदूमूण गेला आहे. अन्न दाते दररोज सकाळ संध्याकाळ अन्नदान करत आहे. या सोहळयासाठी खंडोबा देवस्थान व व बाळूमामाचे भक्तगंण परिश्रम घेत आहे.