खास गौरी-गणपतीच्या सणासाठी एसटी आगाराकडून पुणे-करमाळा रात्रीची बससेवा होणार सुरू

संग्रहित छायाचित्र

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – खास गौरी गणपती निमित्ताने येत्या १६ सप्टेंबर पासून गणपती विसर्जनापर्यंत पुण्यातून रात्री करमाळ्याला येण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती करमाळा एसटी आगाराचे व्यवस्थापक वीरेंद्र होणराव यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अनेक लोक गणेशोत्सवामध्ये पुण्यातील विविध मंडळांचे गणेशोत्सव देखावे, विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी , खरेदी करण्यासाठी पुण्यामध्ये जात असतात. सध्या पुण्याहून करमाळ्याला येण्यासाठी शेवटची बस स्वारगेटहुन सव्वा सहा वाजता सुटते. ही बस गेल्यानंतर पुण्याहुन करमाळ्याला यायला कोणतीच बस नसते. या कारणाने गणेशोत्सव पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना ही बस पकडण्यासाठी धावा धाव करून स्वारगेटला पोहोचावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी करमाळा एसटी आगाराने खास गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने 16 सप्टेंबर पासून रात्री साडेनऊ वाजता वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) बस स्थानकाहुन रात्री ९:३० वाजता सुटणारी बस सुरू केली आहे. ही बस स्वारगेटला रात्री सुमारे १०:१५ च्या आसपास पोहोचून करमाळ्याला येण्यासाठी रवाना होणार आहे. ही नवीन बस गणेशोत्सव च्या विसर्जनादिवशी पर्यंत चालू असणार आहे. जर या बसला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर पुढेही ही बस कायम चालू ठेवली जाणार असण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी या बसचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा एसटी आगाराच्या वतीने श्री. होणराव यांनी केले.

संबधित बातमीकरमाळा बस स्थानक वेळापत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!