करमाळा येथे विद्या विकास मंडळाच्या नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन

करमाळा – करमाळा येथील विद्या विकास मंडळ या संस्थेच्या नवीन विश्रामगृहाचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष तात्यासाहेब मस्कर, संस्थेचे खजिनदार गुलाबराव बागल,संस्थेचे विश्वस्त आशुतोष घुमरे या मान्यवरांच्या हस्ते दि.१३ सप्टेंबर रोजी संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, माजी प्राचार्य नागेश माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक आणि कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


