सरपडोह येथे ग्रामसभेमध्ये नागनाथ आप्पा भिताडे यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सरपडोह (ता.करमाळा) येथे ग्रामपंचायत सरपडोह यांच्यावतीने ग्रामसभा घेण्यात आली. ही सरपंच मालनताई वाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, या ग्रामसभेमध्ये गाव तंटामुक्ती समितीची निवड करण्यात आली व तंटामुक्ती अध्यक्षपदी नागनाथ आप्पा भिताडे यांची निवड करण्यात आली. तसेच गाव ओ डी एफ प्लस हागणदारी मुक्त गाव घोषणा ग्रामसभेमध्ये करण्यात आली.
या ग्रामसभेसाठी गावातील सर्व वाडी वस्त्यांवर भगीरथ लाईट देण्यासंदर्भात तसेच गाव, वस्तीवाड्यांना स्टेट लाईट देण्यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला. जलसिंचन वाढवण्यासाठी, वड्यांवरती खोलीकरण व गवारे ओढ्यावर सिंचन बंधारे मिळण्याबाबत ठराव करण्यात आला. तसेच गावातील शासकीय कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या वेळेमध्ये गावामध्ये ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित राहण्याबाबत ठराव करण्यात आला.
ग्रामसेवक आबासाहेब खाडे यांनी ग्रामसभेत सर्व विषय वाचून दाखवले.गावातील शिवरस्ते , शेत रस्ते, तसेच बांधावरील फळबाग लागवड अशा विविध रोजगार हमीतून होणाऱ्या कामांचे यादी ग्रामस्थांकडून मागविण्यात आलीआहे ,तसेच आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांवर ते सुविधा सर्व ग्रामस्थांना मिळाव्यात याविषयी सूचना करण्यात आल्या.
यावेळी उपसरपंच नाथराव रंदवे यांनी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष व समितीतील सर्व सदस्य यांचे मनपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानलेतसेच ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचे पाठपुरावा करून सर्व सुविधा मार्गी ला लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामसेवक भाऊसाहेब, मुख्याध्यापक, कृषी सहाय्यक, वायरमन, गावातील ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.