सामाजिक कार्यकर्ते सुजिततात्या बागल यांचे कार्य उल्लेखनीय – गणेश करे-पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सुजित तात्या बागल यांचे सामाजिक कार्य पहात आलेलो आहोत, मांगी गावासह तालुक्यातील गावामध्ये सुजिततात्या बागल हे विविध सामाजिक उपक्रम राबवून गावातील गोरगरीब कष्टकरी ,शेतकरी, यांना मदतीचा हात देत असतात, त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले.
आई रेणुका माता मंदिर ट्रस्ट यांचेवतीने महात्मा गांधी जयंती निमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार म्हणून स्टीलची मजबूत काठी व औषधाचे मोफत किट देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यश कल्याणी परिवाराचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना करे- पाटील म्हणाले की, दुष्काळामध्ये मोफत चारा छावणी पाणीटंचाईच्या काळात स्वतःच्या टँकरने मोफत पिण्याचे पाणी वाटप गावातील निराधार गरजू वृद्ध व्यक्तींना दोन वेळचे मोफत अन्नदान ,असे अनेक सामाजिक उपक्रम सुजित तात्या बागल हे राबवत असतात त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मांगी येथील गरजू लाभार्थ्यांसह ,ग्रामस्थ दिलीप निवृत्ती बागल, निळकंठ बागल ,विठ्ठल रामा बागल ,नामदेव नारायण बागल ,गणेश नरसाळे ,नंदकुमार गुलाब , निखिल बागल, प्रताप बागल, रतन नरसाळे ,आकाश नरसाळे ,हरिचंद्र जमदाडे मांगी ग्रामपंचायत सदस्या स्नेहल अवचर , सौ शहाबाई नरसाळे उपस्थित होते, सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांनी केलेले या कार्याचे तालुक्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.