भिलारवाडी येथे ‘ऑक्सिजन हब’चे लोकार्पण संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी भविष्यात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून जागोजागी ऑक्सिजन हबच्या निर्मितीची गरज असुन, या संदर्भात आशिर्वाद वृक्ष फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी म्हटले आहे. भिलारवाडी (ता करमाळा) येथे आशिर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘ऑक्सीजन हबच्या’ लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
भिलारवाडी येथे आशिर्वाद वृक्ष फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथील’ द स्काय किचन’यांच्या सहयोगातून मकाई साखर कारखान्याच्या समोर मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून मिनी जंगल साकारण्यात आले आहे’ या स्मृतीवनाचा वसुंधरा लोकार्पण सोहळा द स्काय किचनच्या वृषाली गोसावी तहसीलदार समीर माने पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना तहसीलदार माने म्हणाले सध्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे सर्वत्र ऑक्सिजन पातळी फारच कमी होऊ लागली असून वृक्ष लागवड हाच यावरील उपाय आहे यासाठीच्या अनेक स्वयंसेवी संस्था लोकांमध्ये जागृती करून आर्थिक मदतही करत आहेत त्याचा लाभ तालुक्यातील ज्यास्तीत ज्यास्त लोकांना होण्यासाठी.
आशिर्वाद वृक्ष फाउंडेशने प्रयत्न करावा. यासाठी जे इच्छुक असतील त्यांना शासन स्तरावरून काही सहकार्य लागल्यास ते मिळेल.पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनीच पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सुरवातीला आशिर्वाद वृक्ष फाउंडेशनचे सुनील चौरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकामध्ये ‘ऑक्सिजन हब’ ही संकल्पना स्पष्ट केली यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे वन विभागाचे तालुका अधिकारी सागर मगर ‘द स्काय किचन’च्या वृषाली गोसावी यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले , सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर , मंडल कृषी अधिकारी बी.एस.चौधरी,केतन गोसावी.अविनाश निमसे, सरपंच भारत गिरंजे,रामभाऊ येडे, गजेंद्र पोळ प्रशांत नाईकनवरे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.

