ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन - Saptahik Sandesh

ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन

करमाळा / संदेश प्रतिनिधी : भास्कर पवार…

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांच्यावतीने राज्यात सर्व तालूका व जिल्हा स्तरावर लाक्षणिक उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येत असून याचाच एक भाग व पाठींबा म्हणून करमाळा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या मागण्या संदर्भा तहसीलदार करमाळा व गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा यांना विविध मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले.

या निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत…
1) दिनांक 08/ 03 /2011 च्या अर्धवेळ शासन निर्णय पूर्णवेळ करून ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे. 2) ग्राम रोजगार सेवकांना निश्चित मानधन देऊन ते त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे. 3) ग्राम रोजगार सेवक यांना विमा कवच लागू करण्यात यावे. 4) मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी रिचार्ज सह नवीन मोबाईल देण्यात यावा. 5) वयोवृद्ध ग्रामरोजगार सेवकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला पदावर घेण्यात यावे. 6) थकीत मानधन दिवाळीच्या अगोदर ग्रामरोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात यावे. 7) प्रवास भत्ता व स्टेशनरी खर्चाची लवकरात लवकर पूर्तता करण्यात यावी.

या पध्दतीने विविध मागण्या संदर्भात ग्राम रोजगार सेवक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालूका अध्यक्ष कृष्णा ढेरे ,हनूमंत भांडवलकर, भानुदास काळे, महादेव भिसे ,भास्कर पवार, संतोष कळसे, भिमराव वायकर, धनंजय शिंदे, अंकुश येवले, मारुती घोगरे ,नंदकुमार नाळे,हेमंत जाधव,काळे, दत्ता हिरडे, ठोसर, आदि ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!