टेंभुर्णीतील ‘शिवविचार प्रतिष्ठानच्या दसरा मेळाव्यात डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांना सामाजिक पुरस्कार – आज टेंभुर्णीत विविध क्षेत्रातील पुरस्काराचे वितरण…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : टेंभुर्णी (ता.माढा) येथील “शिवविचार प्रतिष्ठानच्या” प्रथम वर्धापन दिनानिमित्त दसरा मेळावा आयोजित केला असून, या मेळाव्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे, या पुरस्कार वितरण सोहळ्यात पाच जणांना पुरस्कार दिले जाणार असून, यामध्ये करमाळा तालुक्यातील ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांना सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिव विचार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू खटके पाटील यांनी केले आहे.
या पुरस्काराचे वितरण आज (ता.5) सायंकाळी ६ वाजता टेंभुर्णी येथे होणार आहे, या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पंढरपूर-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुरस्काराचे वितरण आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख वक्ते म्हणून विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक महेंद्र कदम व शिवव्याख्याते हर्षल बागल हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी मावळा ग्रुप कुर्डूवाडी यांचा महिला दांडिया तसेच पालवण येथील संजोबा लेझीम संघ तसेच बबनराव शिंदे प्रशाला अकोले बुद्रुक यांचे लेझीम पथक मुलींचा तसेच बबनराव शिंदे प्रशाला अकोले यांचा तलवारबाजी मुलांचा असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन गणेश व्यवहारे, गणेश शिंदे, सचिन पवार, योगेश खराडे पाटील, अजय जाधव, पाटलू भाऊ खटके, हनुमंत ढवळे, सागर कटके यांनी केले आहे.
जिजाऊ सामाजिक पुरस्कार सौ स्मिता पाटील यांना तसेच सामाजिक पुरस्कारडॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांना तसेच साहित्यिक पुरस्कार प्राध्यापक संजय साठे यांना तसेच कृषी भूषण पुरस्कार सोमनाथ हुलगे तर व्यसनमुक्त पुरस्कार श्री बाळासाहेब माने यांना जाहीर करण्यात आला आहे.