‘आदिनाथ’ कारखान्याचा ‘बाॅयलर अग्निप्रदिपन’ समारंभ उद्या 11 डिसेंबरला होणार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाॅयलर अग्नि प्रदिपनाचे पूजन उद्या सकाळी ठीक 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती आज रोजी कारखाना स्थळावर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये ठरले असून, या बाॅयलर अग्नि प्रदिपनाचे पूजन ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर व ह. भ.प. विठ्ठल महाराज पाटील, शेटफळ यांच्या हस्ते होणार आहे.
श्री सत्यनारायण महापूजा कारखान्याचे संचालक अविनाश वळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते होणार असल्याचे कारखान्याच्या प्रशासनाने सांगितले.
या वर्षीचा चालू गळीत हंगाम 2022-23 च्या बाॅयलर पूजनासाठी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते आणि पाटील गटाचे नेते नारायण आबा पाटील हे उपस्थित राहतील. कारखान्यामधील सर्व कामे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे या वर्षी होणारा गळीत हंगाम चांगल्याप्रकारे यशस्वी होईल असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. उद्या होणा-या बाॅयलर अग्नि प्रदिपनसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, माजी संचालक मंडळ, शेतकरी, सभासद यांनी उपस्थित राहावे असे कार्यकारी संचालक अरुण बागनवर यांनी आवाहन केले आहे.