करमाळ्यातील राम मंदिराचा जीर्णोध्दार – स्लॅपपर्यंत बांधकाम पूर्ण – जीर्णोध्दार समितीचे मदतीचे आवाहन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठ येथील वीर चौकात असलेल्या श्रीराम मंदिराचा जीर्णोध्दार होत असून आत्तापर्यंत मंदिराचे स्लॅपपर्यंत बांधकाम झाले आहे.भिंतींना गिलावा, श्रीरामचे आतील मंदिर, स्टाईल फरशी, दरवाजे आदी रेखीव काम राहिलेले आहे.
तरी ज्यांना मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी आर्थिक स्वरूपात किंवा वस्तू स्वरूपात मदत करायची आहे; अशा दानशूर व्यक्तींनी विजय देशपांडे (मो. ९४२०७८२९९८), राधेशाम देवी (मो.९४२३३२६५८६), महेश परदेशी (मो.७०३०५६०४६०), दर्शन कुलकर्णी (मो.९८८१५८५००१), रूपेश वनारसे (मो.९४२१०७०७२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्रीराम मंदिर जीर्णोध्दार समितीने केले आहे.