विमा क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान ‘MDRT 2023’ हा पुरस्कार जेऊर येथील सौ. किरण वळेकर यांना प्राप्त..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : विमा क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान MDRT 2023 (मिलियन डाॅलर राऊंड टेबल) हा पुरस्कार जेऊर येथील सौ.किरण धनंजय वळेकर यांना प्राप्त झाला आहे.
हा बहुमान आयुर्विमा सल्लागार धनंजय वळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला असून, एलआयसी बार्शी शाखेअंतर्गत जेऊरला दुसर्यांदा यांच्याच माध्यमातून मिळत आहे, देशभरात एलआय सी चे 13 लाख विमा प्रतिनिधी आहेत त्यापैकी २५००/३००० प्रतिनिधी स्पर्धेतुन पात्र होतात तो बहुमान आपल्या ग्रामीण भागातून काम करत असणाऱ्या सौ.वळेकर या महिला प्रतिनिधिस मिळाला आहे.
याकामी प्रमुख विमा सल्लागार धनंजय वळेकर यांचेकडून मार्गदर्शन लाभले तसेच बार्शी शाखेचे शाखाधिकारी तुषार घाडगे करमाळा S O शाखेचे शाखाधिकारी सुदर्शन शिरूरकर तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.