निरपेक्ष रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षणाचा प्रमुख उद्देश असावा - माजी आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

निरपेक्ष रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षणाचा प्रमुख उद्देश असावा – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : निरपेक्ष रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षण पुर्ण करण्याचा प्रमुख उद्देश असावा, असे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला आहे, ते जेऊर (ता.करमाळा) येथील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नीट या राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परिक्षेत उल्लेखनीय यश मिळवून एम. बी. बी. एस. च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्राप्त केल्याबद्दल उदय पांडूरंग वाघमारे याचा गुणगौरव सोहळा जेऊर ता. करमाळा येथे आयोजित करण्यात आला.यावेळी माजी आमदार दत्तात्रय सावंत, माजी आमदार नारायण पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादीया, संचालक विलास पाथ्रुडकर, सचीव प्रा. अर्जूनराव सरक, सोलापुर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक मोहोळकर, माजी प्राचार्य ह. सि. धालगडे, मरळ, प्राचार्य दहिभाते, मुख्याध्यापक व्यवहारे, कांबळे सर, महात्मा गांधी प्रशालेचे प्राचार्य कापले सर, हेडगेवार विद्यालय गौंडरे प्राचार्य सांगडे सर, नुतन विद्यालय केम प्राचार्य रणदिवे सर, हिसरे हायस्कूल मुख्याध्यापक जगदाळे सर, माध्यमिक पतसंस्था चेअरमन सौ मनिषा सपकाळ, माजी चेअरमन यशवंतराव लावंड, माजी चेअरमन किरण किरवे सर, सालसे यात येथील न्यु यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव सपकाळ सर,जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे कार्याध्यक्ष किरण परदेशी सर, वामनराव बदे विद्यालय उमरड प्राचार्य कोठावळे, सहदेव वाघमारे यांचेसह शिक्षण व इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळ, ग्रामपंचायत जेऊर, माध्यमिक शिक्षक पतसंस्था करमाळा व सोलापूर आदिंसह अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाच्या वतीने उदय वाघमारे याचा सत्कार करण्यात आला.उदय वाघमारे याने नीट परिक्षेत यश मिळवल्याने त्यास आता एमबीबीएस या शिक्षणासाठी चिपळूण जि. रत्नागिरी येथील
बी के एल वालावलकर कॉलेज येथे प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल कौतूक करताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, उदय वाघमारे याचे यश सर्वसामान्य व गरीब कुटुंबातून शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे ठरणार आहे.

यावेळी प्रा. धालगडे, प्रा.सरक, कांबळे सर, तळेकर आदिंनी विचार व्यक्त केले. अंगद पठाडे यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब शिंदे सरांनी आभार व्यक्त केले.या कार्यक्रमास जेऊर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिला पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!