पैज लावून मटका खेळणाऱ्याविरूध्द पोलीस कारवाई.. - Saptahik Sandesh

पैज लावून मटका खेळणाऱ्याविरूध्द पोलीस कारवाई..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा शहरात कल्याण नावाचा मटका खेळण्यासाठी पैज लावून जुगार खेळणाऱ्या व्यक्तीस करमाळा पोलीसांनी पकडले असून, त्याच्याकडून १२०० रूपये जप्त केले आहेत. हा प्रकार २ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता साठेनगर येथे घडला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या आदेशावरून पोलीस कॉन्स्टेबल मनजीत संजय भोसले यांनी फिर्याद दिली.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की अवैध धंदे तपासणीकामी करमाळा शहरातून पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की साठेनगर येथील जुन्या आण्णासाहेब हायस्कुल जवळील आडोशाला राकेश राजू अडसुळ (वय २७, रा. साठेनगर) हा कल्याण नावाचा मटका पैज लावून खेळत होता. त्याला जागीच पकडले असून त्याच्याकडून १२०० रूपये जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!