शेतातील बांधावरून का जातो म्हणून भगतवाडी येथे एकास मारहाण.. - Saptahik Sandesh

शेतातील बांधावरून का जातो म्हणून भगतवाडी येथे एकास मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : शेतातील बांधावरून का जातो.. असे म्हणून तिघांकडून एकास खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. हा प्रकार २ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भगतवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी किशोर कांतीलाल गिरंजे यांनी फिर्याद दिली.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी जात असताना आमच्या बांधावरून का जातो. या कारणावरून निलकंठ सदाशिव गिरंजे, सदाशिव हरिश्चंद्र गिरंजे व आण्णा पांडूरंग गिरंजे यांनी मला खोऱ्याच्या दांड्याने व हाताने मारहाण करून शिवीगाळ देऊन दमदाटी केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!