दिवेगव्हाण येथून १५ वर्षाची युवती बेपत्ता.. - Saptahik Sandesh

दिवेगव्हाण येथून १५ वर्षाची युवती बेपत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथून १५ वर्षाची युवती ३० नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही ऊसतोड मजूर असून परिवारासह दिवेगव्हाण येथे आलो आहोत. १ डिसेंबर रोजी मध्यरात्री आम्ही राहत असलेल्या कोपीतून आम्ही सर्व झोपेत असताना माझी १५ वर्षाची मुलगी निघून गेली आहे. मला असा संशय येतो, की तिला अमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!