मोटारसायकलला धडक देऊन जातीवाचक शिवीगाळ – सावडी येथील घटना..

करमाळा संदेश प्रतिनिधी : मोटारसायकलला ट्रॅक्टर चालकाने धडक देऊन अपघात केला शिवाय जखमींना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार सावडी येथे ११ मे ला सायंकाळी चारच्या सुमारास घडला आहे.

या प्रकरणी निकत जया काळे (रा. पारेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, मी पारेवाडी येथे मोटारसायकल वरून जात होतो. माझ्या सोबत माझी पत्नी माधवी व मुलगी आरोही असे तिघेजण होतो. सावडी फाट्याजवळ आल्यानंतर बिगर नंबरच्या सोनालिका ट्रॅक्टरने माझ्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात आम्ही जखमी झालो.

त्यानंतर त्या ट्रॅक्टर चालकाकडे जाऊन ट्रॅक्टरची चावी काढून घेतली असता, ट्रॅक्टर चालकाने आणखी तिघांना बोलावून घेऊन चौघांनी मिळून आम्हांस जातीवाचक शिवीगाळ केली व मारहाण केली. माझ्या बहिणीला बोलावून घेतले असता, तिलाही मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी पप्पू प्रल्हाद एकाड वगैरे चौघांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.





