जेऊर येथून मोटारसायकलची चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जेऊर येथून घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने चोरून नेली आहे. हा प्रकार ९ मे च्या मध्यरात्री घडला आहे. या प्रकरणी समीर रफिक पटेल (रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्या मालकीची होंडा युनिका कंपनीची एमएच ४५ एपी ६७९६ ही मोटारसायकल जेऊर येथून राहत्या घरासमोरून ९ मे ला रात्री पावणे अकरा वाजता लावली होती. १० मे ला सकाळी पाहिले असता तिथे मोटारसायकल दिसेनाशी झाली. शोध घेऊनही मोटारसायकल न सापडल्याने त्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







