कंदरचे ग्रामदैवत स.शहानुर नाना साहेब यांच्या ऊरुसास आज पासून सुरुवात

कंदर(संदीप कांबळे) : कंदर (ता. करमाळा) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या सय्यद शहानूर (नाना) यांच्या वार्षिक ऊरुसास बुधवार, ३० एप्रिलपासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती यात्रा समितीने दिली आहे. या निमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज (दि.३०) रात्री ९ वाजता संदल मिरवणुकीने ऊरुसाला सुरुवात होणार आहे. गुरुवार, १ मे रोजी दुपारी ४ वाजता पारंपरिक गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल, तर रात्री ९ वाजता छबिना मिरवणूक काढली जाईल.

शुक्रवारी, २ मे रोजी दुपारी ३ वाजता ज्योतिबा नगर येथे भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कंदर येथे कव्वालीचा कार्यक्रम रंगणार आहे.

ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी बुधवार, १४ मे रोजी सायंकाळी ८.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानावर कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध वैभव डान्स म्युझिकल ऑर्केस्ट्राचा विशेष कार्यक्रम होणार आहे.



