पूरग्रस्त जनावरांसाठी साडेतीन टन मुरघास; आई कमलाभवानी सामाजिक संस्थेचा पुढाकार

करमाळा : स्व. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या स्मरणार्थ करमाळ्यातील आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांतील जनावरांसाठी साडेतीन टन (साठ पोती) मुरघास तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिल्पा ठोकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

पूरग्रस्त शेतकरी व जनावरांना मदतीचा हात देण्यासाठी संस्था नेहमी तत्पर राहील, असे या वेळी सांगण्यात आले. गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी समाजाचे काहीतरी देणे लागते, या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार विजय लोकरे, शत्रुघ्न चव्हाण, डॉ. सतिश देवरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रोहन पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील, अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत आवताडे, सुजित बागल, रमेश कांबळे, अशपाक जमादार, नितीन राजेभोसले, पत्रकार जयंत दळवी, तात्यासाहेब जाधव, राहुल जाधव, सूरज ढेरे, विशाल लेंडवे, चेतन जाधव, अवधूत घाडगे, तुषार जाधव, दिपक शिंगटे, नागनाथ शिंगटे, संदीप घाडगे, सुशांत जाधव, शरद नलवडे, आजिनाथ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
“पूरग्रस्त भागातील नागरिक किंवा जनावरांना आणखी काही मदतीची गरज भासल्यास आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था नेहमीच तत्पर राहील,” असे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजिंक्य पाटील यांनी सांगितले.



