“न समजलेले आईवडील” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमाला केडगाव ग्रामस्थांची गर्दी

करमाळा(दि.१४) : केडगाव (ता.करमाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या व देशसेवेचे कार्य गावातील सुपुत्रांचा सन्मान व ढासळत चाललेल्या समाजव्यवस्थेत समाज प्रबोधनासाठी आयोजित प्रा.वसंतराव हंकारे यांच्या “न समजलेले आईवडील ” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. वसंत हंकारे यांचे आईबापांचा मुलांसाठीची त्यागाची भावना समजून सांगताना भावनिक व्याख्यान ऐकताना महिलांना अश्रू अनावर झाले.


केडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यावर्षी कुस्त्याचे मैदान व इतर कर्मणुकीच्या कार्यक्रमाला फाटा देऊन येथील भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने वर्षभरामध्ये गावातील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध शासकीय सेवेत निवड झालेल्या व अखंडपणे देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या गावच्या सुपुत्रांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील होते.

यावेळी बोलताना करे-पाटील म्हणाले की काही यात्रा म्हणजे खरेतर धार्मिक उत्सव असतो परंतु केडगाव येथील तरुणांनी याला सामाजिकतेची जोड देऊन गावातील संघर्षमय वाटचाल करून यशवंत झालेल्या व देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात कार्य करत असलेल्या गावातील तरुणांचा केलेला सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम केला तो इतर गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम असून केडगावच्या तरुणांचा आदर्श इतर ठिकाणच्या तरुणांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नंदकिशोर वलटे यांनी केले प्रास्ताविक भैरवनाथ मित्र मंडळाचे वैभव बोराडे यांनी केले तर आभार सचिन बोराडे यांनी मानले यावेळी गावातील अन्न सुरक्षा अधिकारीपदी निवड झालेल्या रोहित लोकरे , याबरोबरच विविध विभागांत निवड झालेल्या रोहन बोराडे, रोहित बोराडे, दिपक मस्तूद, प्रितम गुटाळ,तेजस बोराडे, संदेश बोराडे,करन गायकवाड, प्रतिक्षा मस्तूद, यांचा तर भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या नारायण बोराडे, प्रदिप गोडसे,अमीत खोलासे यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील गजेंद्र पोळ प्रशांत नाईकनवरे ग्रामस्थ व परिसरातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.

प्रा.वसंत हंकारे यांनी न समजलेले आईबाप या विषयावर बोलताना आई-वडील या नात्यातील विविध पदर उलगडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला हास्याचे फवारे तर आई व बाप या विषयी भावनिक साद घालताना अक्षरशः ऐकणाऱ्या महिला व पुरुष वर्गांच्या भावनेचा बांध फुटून डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळले यावेळी अत्यंत भावनिक वातावरण होऊन न समजलेले आपलेच आई व आई वडील याविषयी मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण झाला होता.

