ऊत्तरेश्वर मंदिरात विदयागिरी महाराज यांची पुण्यतिथी केली साजरी
केम ( प्रतिनिधी- संजय जाधव ) :केम तालुका करमाळा येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात विदयागिरी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी महंत जयंतगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
सुरूवातीला सकाळी आठ वाजता श्री ऊत्तरेश्वर बाबास व मंदिरातील सर्व देवाला व समाधीस अभिषेक करण्यात आला. या निमित्त सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.ज्ञानेश्वर पाटील दहिवली यांचे कीर्तन झाले त्यानंतर बरोबर १२ वा.५ मि. पुष्यवृष्टि करण्यात आली. या वेळी महाराष्ट्रातील विविध आखाडयाचे साधू उपस्थित होते. यानंतर आलेल्या हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी माजी जि.प. सदस्य दिलीप तळेकर, ऊत्तरेश्वर देवस्थान चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य विजय तळेकर भाऊसाहेब बिचीतकर,मोहन दोंड, ऐ,पी,ग्रुप चे अध्यक्ष अच्युत काका पाटिल, माजी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, राहुल कोरे, तळेकर मेजर आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कुंभार महाराज विजय दौड भैरू दौड दिलीप पवार ह,भ,प, मारूती पळसकर, मच्छिंद्र तळेकर भिलार महाराज सातोली रमेश तळेकर ज्ञानेश्वर तळेकर ज्ञानेश्वर दिक्षीत, संजय दौंड, चंद्रकांत तळेकर,प्रदिप वासकर, पल्लवी देवकर, समाधान गुरव,ऊत्तरेश्वर टोणपे, सुब्राव गुरव पाटिल पांडुरंग तळेकर, संदिप गोडसे राजेंद्र भिताडे, सखाराम घाडगे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी केम व परिसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.