पुण्यात १९ नोव्हेंबरला रंगणार महिला गझल संमेलन-गझल मंथन साहित्य संस्थेचा उपक्रम

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,१६: पुणे येथे येत्या रविवारी ( दि.१९) गझलक्षेत्रात प्रथमच महिला गझलकरांचे अखिल भारतीय महिला गझलसंमेलन आयोजित केले आहे. या गझल संमेलनाला महाराष्ट्रासह शंभराहून जास्त महिला गझलकारा उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था “गझल मंथन साहित्य संस्था” आणि “पुणे जिल्हा कमिटी”तर्फे वीर स्मारक, डेक्कन कॉर्नर, कर्वे रोड ,पुणे येथे हे गजलसंमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनाला अध्यक्षा म्हणून ज्येष्ठ गझलकारा शोभा तेलंग उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे उद् घाटन जेष्ठ गझलकारा संगीता जोशी यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून उर्मिला बांदिवडेकर, डॉ. संदीप गुप्ते, किरण केंद्रे, प्रमोद खराडे आणि संस्थेचे सचिव श्री.जयवंत वानखेडे उपस्थित राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ गझलकारा देवका देशमुख यांना गझल क्रांति पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.या संमेलनात गझल मंथन साहित्य संस्थेचा दिवाळी विशेषांक आणि गझलयात्री मालिकेतील तिसऱ्या मालीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संमेलनाचे सूत्रसंचालन गझलकारा वैशाली माळी करतील. या संमेलनात एकूण सहा मुशायरे होतील. त्यात देशभरातील नामांकित महिला गझलकारा गझला सादर करणार आहेत.
रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल , उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, प्रसिद्धीप्रमुख भरत , पुणे विभाग प्रमुख प्रदीप तळेकर, उपप्रमुख मंदार खरे, सचिव वैशाली माळी पुणे जिल्हाध्यक्ष बा. ह. मगदूम व उपाध्यक्ष डॉ. विजया नवले यांनी केले आहे.