जिल्हासत्र न्यायाधीश यांची नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर न प.सेंट्रल स्कूल मुले नंबर 1 या शाळेस भेट… - Saptahik Sandesh

जिल्हासत्र न्यायाधीश यांची नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर न प.सेंट्रल स्कूल मुले नंबर 1 या शाळेस भेट…


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा नगरपालिकेच्या नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर न.प. सेंट्ल स्कूल मुले नंबर 1 करमाळा या शाळेस जिल्हा सत्र न्यायाधीश श्री.जगदाळे यांनी भेट देऊन शाळेच्या सर्व भौतिक सुविधांची व शाळेच्या निसर्गमय वातावरणाची पाहणी केली.

तसेच पाचवी शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षेतील घेण्यात येणारी तयारी व शाळेच्या यशस्वी वाटचाली बद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, तुम्ही सर्व शिक्षक खूप नशीबवान आहात. मुलांचे निरागस चेहरे पाहून आपल्या कामाची सुरुवात होते. या तपासणी पथकासोबत प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, अतुल पाटील केंद्र समन्वयक दयानंद चौधरी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनंदा जाधव व शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!