‘योग’..शरीर, मन, आणि आत्मा यांना संतूलनात आणतो – सूधाताई अळ्ळी मोरे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : : शरीर, मन, आणि आत्मा यांना संतूलनात आणण्याचे काम हे योग करत असतो, योग आपल्या रोजच्या मागणी, समस्या, यांना तोंड देण्यास मदत करतो, तसेच
शरीराला तूंदरूस्त ठेवण्यासाठी योग अंत्यंत प्रभावशाली आहे, योगा फक्त व्यायामाचा प्रकार नाही तर योगामुळे आपल्या संपूर्ण शरीराला कसरत प्राप्त होते.
योगा केल्याने जीवनातील ताणतणाव नाहीसा होतो आणि शरीर निरोगी बनते तसेच योगामुळे रक्तदाबासारख्या समस्या नाहीशा होतात, असे मत केंद्रीय राज्य महिला प्रभारी सूधाताई अळ्ळी मोरे यांनी व्यक्त केले.
करमाळा येथे पतंजली आढावा बैठकीच्या निमित्ताने गूरुप्रसाद मंगल कार्यालय येथे केंद्रीय राज्य महिला प्रभारी सूधाताई अळ्ळी मोरे, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी श्री सूरेंद्र पिसे, पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी विशाल गायकवाड, मीडिया जिल्हा प्रभारी मधूकर सूतार,माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, समाजसेवक श्रेणीक खाटेर, पत्रकार सचिन जव्हेरी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आढावा बैठकीमध्ये सर्वांनी एकदिलाने आणि एक मनाने काम करावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका समिती चे गठन करण्यात आले असून श्री.हनूमानसिंग परदेशी (भारत स्वाभिमान तालुका प्रभारी), बाळासाहेब नरारे (तालुका पतंजली योग समिती प्रभारी), रामचंद्र कदम सर(तालुका किसान सेवा समिती प्रभारी), प्रविण देवी(तालुका यूवा प्रभारी), राधिका वांशिबेकर(तालुका महिला प्रभारी),
दिपक कटारिया (कोशाध्यक्ष), अजित नरसाळे (तालुका मीडिया प्रभारी) इत्यादी ची नियूक्ती करण्यात आली असून माजी प्राचार्य जयप्रकाश बिले यांची जिल्हा समितीवर निवड करण्यात आली आहे.
यावेळी नगरसेवक महादेव (अण्णा)फंड, नगरसेविका संगिता ताई खाटेर,माधूरी साखरे,
मंजूदेवी शिवकन्या नरारे, रविंद्र सपकाळ (योग शिक्षक),सूधीर पंडीत गूरुजी( योग शिक्षक) तसेच महीला व पूरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रास्ताविक रामचंद्र कदम सर, सूत्रसंचालन बाळासाहेब नरारे व आभार दिपक कटारिया यांनी केले.