आयटी क्षेत्रातील युवकांने शेतीत केला कोहाळ्याचा प्रयोग – अर्ध्या एकरात मिळवले लाखाचे उत्पन्न..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा : आय.टी. क्षेत्रातील म्हणजे बी.सी.ए. झालेल्या किरण जाधव या युवकांने स्व:ताच्या पांडे येथील शेतीत अर्धा एकरात कोहळ्याचे यशस्वी पीक घेऊन एक नवा मार्ग स्विकारला आहे.
किरण जाधव हा घरातील एकुलता एक युवक असून त्याचे बी.सी.ए. चे शिक्षण नुकतेच पुर्ण झाले. नोकरी तातडीने मिळत नाही हे लक्षात आल्यावर बसून काय करायचे ..? असा विचार केला. त्यानंतर शेतीत काहीतरी करू असे त्यांनी ठरवले. त्यामुळे त्यांनी रोपळे येथील स्वप्नील दास यांच्या बरोबर चर्चा केली. त्यांनी किरण जाधव यांना कोहळ्याचा प्रयोग करून पहा असे सुचवले व त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले तर मेव्हुणे विकास शिर्के यांनी आर्थिक मदत केली.
त्यानंतर श्री.जाधव यांनी अर्धा एकर क्षेत्राची व्यवस्थित निगा केली. नांगरट केली, कोंबडी खत टाकले, त्यानंतर मोगडा व पाळी नंतर बेड करून ठिबक व मलचींग केले. त्यानंतर मायको जातीचे बी सव्वा फुट अंतरावर लावले. आठवड्यातून तीनदा पाणी दिले. त्याला रासायनिक खतामध्ये २४-२४-०० व पोटॅश दिले. वेलावर आळी पडली होती. त्यावर दमण-४७ ची फवारणी केली. साधरणत: अडीच महिन्यापासून फळ सुरू झाले.
त्यानंतर श्री. जाधव यांनी अर्धा एकर क्षेत्राची व्यवस्थित निगा केली. नांगरट केली, कोंबडी खत टाकले, त्यानंतर मोगडा व पाळी नंतर बेड करून ठिबक व मलचींग केले. त्यानंतर मायको जातीचे बी सव्वा फुट अंतरावर लावले. आठवड्यातून तीनदा पाणी दिले. त्याला रासायनिक खतामध्ये २४-२४-०० व पोटॅश दिले. वेलावर आळी पडली होती. त्यावर दमण-४७ ची फवारणी केली. साधरणत: अडीच महिन्यापासून फळ सुरू झाले.
मला शेतीची माहिती नव्हती, परंतू हातात नोकरी नव्हती. मग उगाच इकडे-तिकडे गप्पा मारत बसण्यापेक्षा शेतीत काहीतरी करू असे ठरवले. त्याबाबत मला स्वप्नील दास यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्यातूनच मी या पीकाकडे वळालो. मला घरातील आई व अप्पा यांचे पाठबळ मिळाले. त्यातून मला अर्धा एकरात जवळपास एक लाख रूपयाचे उत्पन्न मिळत आहे. सध्या माझा कोहळा हा पुणे गुलटेकडी मार्केटला जातो. सध्या १५ ते २० रूपये किलो प्रमाणे भाव मिळतो. अत्तापर्यंत तीन ते चार टन माल विकला असून पुढे तेवढाच माल मिळेल. – किरण जाधव, युवा शेतकरी, पांडे