कार्यकर्त्यांच्या बळावरच मी 'आमदार'पदापर्यंत पोहचू शकलो - माजी आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

कार्यकर्त्यांच्या बळावरच मी ‘आमदार’पदापर्यंत पोहचू शकलो – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२३) : माझा कार्यकर्ता विकावु नसून स्वाभिमानी आहे, कार्यकर्त्यांच्या बळावरच मी ‘आमदार’पदापर्यंत पोहचू शकलो असे स्पष्ट मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले. पाटील गटाच्यावतीने आज (ता.२३) माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी जेऊर (ता.करमाळा) येथे साजरा केला.

जेऊर ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार नारायण पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ सुभाष सुराणा हे होते. तर यावेळी व्यासपीठावर माजी जि प सदस्य दिलीपदादा तळेकर, प्राचार्य जयप्रकाश बिले, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे,नवनथ झोळ, धूळाभाऊ कोकरे, जि प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सभापती अतूल पाटील,जि प सदस्य बिभीषण आवटे, उपसभापती गणेश चौधरी, दत्ता सरडे, शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, पोपटशेठ मंडलेचा, रामलाल कोठारी,उदयसिंह मोरे-पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, मा सरपंच भास्कर कांडेकर, सचीव प्रा अर्जून सरक, प्रा. डाॅ अनंतराव शिंगाडे, प्राचार्य दहिभाते, मुख्याध्यापक व्यवहारे,प्रा डाॅ संजय चौधरी जेऊर ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Yash collection karmala clothes shop

माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊरसह करमाळा तालुक्यात अनेक गावात सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेऊर येथे आनंद ऋषीजी नेत्यालय, अहमदनगर यांच्यावतीने जेऊर सकल जैन संघाने भव्य नेत्रशिबीर आयोजित केले. तसेच भव्य आरोग्य शिबीरही राबविण्यात आले. यात विविध आजारावरील तज्ञ डाॅक्टरांनी मोफत रुग्णसेवा केली. यावेळी करमाळा तालूका माळी संघ, सकल जैन संघ, मराठा सेवा संघ, यंग मुस्लीम जमात, नाभीक संघटना, सराफ असोशिएशन, व्यापारी संघटना, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, आनंद पतसंस्था तसेच विविध ग्रामपंचायतीचे व सोसायटींचे वतीने नारायण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास करमाळा मतदार संघातील विविध गावचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक ग्रा प सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार माजी सरपंच सुलेमान मुल्ला यांनी मानले.

माझे कार्यकर्ते हेच माझे बळ असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकणार आहोत, आजपर्यंत जनमत नेहमीच माझ्या बाजूला राहिल्यानेच मी अनेकदा विविध निवडणुकीत धनशक्तींचा पराभव करु शकलो. आदिनाथ सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असून ही लढाई आम्ही जिंकु.…माजी आमदार नारायण पाटील

Sonaraj metal and crockery karmala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!