पाडळी मधील सरपंचांसह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा पाटील गटात प्रवेश - Saptahik Sandesh

पाडळी मधील सरपंचांसह शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा पाटील गटात प्रवेश


करमाळा (दि.२५) –  सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून या पार्श्वभूमीवर विविध गटाचे कार्यकर्ते राजकीय अंदाज घेऊन या गटातून त्या गटात प्रवेश करत असण्याचे सध्या सत्र सुरू आहे.

नुकतेच आमदार संजय शिंदे गटातून पाडळी गावचे सरपंच शिलावती अनिल पिंपरे, सरपंच यांचे पती अनिल पिंपरे, उपसरपंच पांडुरंग ढाणे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी जाधव, भरत साळुंखे, विलास पाटील, दत्तू गावडे, शरद पिंपरे, एकनाथ वायकर, गुरूदास जाधव, गोरख शिंगटे, भैरवनाथ गावडे, बापू मांगले आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश केला. जेऊर येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या शुभहस्ते या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना राष्टवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व  पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला आहे.  त्यानंतर पाडळी येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, करमाळा नगरसेवक अल्ताफभाई तांबोळी, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, उपसभापती दत्तात्रय सरडे, दगडू भोरे, सरपंच अमर ठोंबरे (शेलगाव ), बाबू गुटाळ, संजय पाटील, तानाजी गाडे, पृथ्वीराज पाटील (सरपंच जेऊर), राहुल गोडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!