दत्तमंदिर ते करमाळा न्यायालय रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व डागडुजी केल्याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील बसस्थानकाजवळील दत्तमंदिर ते करमाळा न्यायालय या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले होते, या खड्ड्यासंदर्भात अनेक संघटनांनी आंदोलनाचे इशारा दिले, तसेच निवेदन दिले, तरीसुद्धा हे खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन तयार झाले नव्हते, परंतु काही दिवसांपूर्वी सदरील मार्गावरील खड्डे डागडुजी करण्यासाठी माती व खडी टाकून बुजविले गेले आहेत, त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे, त्यामुळे बाबतीत आपण योग्य तो निर्णय घेऊन येथील मार्गावर लवकरात लवकर मुरूम टाकावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या मार्गावर साठलेल्या चिखलात बांधकाम उपविभागाच्या नावाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल व यास पूर्णतः जबाबदार बांधकाम समिती असणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिगची यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले कि, या मार्गावर मुरूम व खडी टाकणे अपेक्षित होते, परंतु या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माती व खडी टाकली, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. या मार्गाहून विद्यार्थी व नागरिकांची सततची ये – जा असते त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थी नागरिक जात असताना चिखलातून घसरून पडत आहेत. अंगावर चिखल उडल्यामुळे विद्यार्थिनींचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 15 ऑगस्ट रोजी असणाऱ्या अमृत महोत्सव असल्यामुळे या मार्गावरुन यशवंतराव चव्हान महाविद्यालय चे विद्यार्थी, शिक्षक, D.ed कॉलेज चे विद्यार्थी, शिक्षक, कोर्टातील कर्मचारी. मोठ्या संख्येने यांची ये जा राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेली माती या बाबतीत आपण योग्य तो निर्णय घेऊन येथील मार्गावर लवकरात लवकर मुरूम टाकावा अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने या मार्गावर साठलेल्या चिखलात बांधकाम उपविभागाच्या नावाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे. हे निवेदन सादर करताना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ऋषीकेश शिगची, शहर उपाध्यक्ष आरशान पठाण, महादेव थोरात, यश कांबळे, राहुल सरवदे, आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.