केम येथे शिवसेनेच्या वतीने नव्या ‘मशाल’ या चिन्हाचे केले स्वागत
केम (प्रतिनिधी-संजय जाधव ) : केम येथील शिवसेना शहर शाखेच्या वतीने निवडणूक आयोगाकडून मिळालेली ‘मशाल’ या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.
येथील गांधी चौकात शिवसैनिकांनी तेजवत मशाल चौकात आणली.या ज्योतीचे हार घालून पुजा करून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वर्षा ताई चव्हाण म्हणाल्या, शिवसेना पक्षात पन्नास खोके गद्दारांनी शिवसेनेत फूट पाडली आणि पक्षावर दावा सांगितला. निवडणूक आयोगाकडे धनुष्य बाणाची मागणी केली. हे चिन्हं निवडणूक आयोगाकडून तात्पुरते तरी गोठवण्यात आले आहे. त्यानंतर शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या पक्षाला मशाल हे चिन्हं देण्यात आले. हे चिन्हं आम्ही निष्ठावंत शिवसैनिक जनतेच्या मनात रूजवू असे त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेनेचे जेष्ठ नेते भुजंग तळेकर म्हणाले आमचा धनुष्य बाण जरी भाजपाच्या कटकारस्थानामुळे गोठवला असला तरी शिवसेनेचे मतदान तुम्ही गोठवून दाखवा असे चॅलेंज त्यांनी दिले.
यावेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक सागर तळेकर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री हरी तळेकर, शहराध्यक्ष सतीश खानट, माजी उपतालुकाप्रमुख ऊत्तरेश्वर तळेकर, एपी ग्रुप चे अध्यक्ष अच्युत काका पाटिल, प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर,,रमेश तळेकर,शिवाजी मोळिक, ऊत्तरेश्वर गोडगे, अनिल तळेकर , पिंटू तळेकर, पांडुरंग तळेकर, विष्णू अवघडे, महेश तळेकर, बापुराव तळेकर दादा तळेकर, पै महावीर तळेकर, युवा सेना शहराध्यक्ष दिपक भिताडे नवनाथ खानट, समाधान गुरव, गणपत कांबळे, काळे , शिवाजी मोरे आदि उपस्थित होते.