नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध गटाच्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश - Saptahik Sandesh

नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध गटाच्या कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

करमाळा (दि.२६) –  काल महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील यांची शेलगाव (क) ता करमाळा येथे प्रचार सभा संपन्न झाली. या सभेत विविध गावातील विविध गटातील (शिंदे गट व बागल गट) कार्यकर्त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटात तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये खालील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

  • यामध्ये शेलगाव(क) येथील विद्यमान सरपंच आत्माराम वीर,मा.ग्रा.पं.सदस्य हनुमंत वीर,भुजंग वीर,बाबुराव माने,अरुण भाऊ काटोळे,मारुती वाघमारे
  • सौंदे गावातून विद्यमान सरपंच जोतिराम लावंड व इतर कार्यकर्ते 
  • हिसरे गावातून मा. ग्रा. पं. सदस्य प्रकाश खरात, संजय राऊत, लक्ष्मण लोंढे,
  • मिरगव्हाण गावातून उपसरपंच रामभाऊ ओहोळ, मा.ग्रा.पं. सदस्य भागवत सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य सचिन लावंड, माजी ग्रामपंचायत सदस्य सोपान हाके, कालिदास दिसले सोपान हाके राजेंद्र सुरवसे नाथराव सुरवसे,नागनाथ सुरवसे,बालाजी सुरवसे भिमराव सुरवसे शिवाजी पवार लक्ष्मण पवार, रामदास शिंदे लक्ष्मण शिंदे बाळू शिंदे सोमनाथ शिंदे सचिन शिरसाट संभाजी शिरसाट,वसंत ओहोळ बापूराव मोहोळ अमोल सुरवसे आबा सुरवसे

सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते श्रीधर पाटील होते तर यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, माजी संचालक धुळा भाऊ कोकरे, माजी सरपंच पोपट पाटील ( नेर्ले ), उपसभापती दत्ता सरडे, माजी सरपंच भास्कर भांगे ( कंदर ), आदिनाथ कारखान्याचे प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, बाजार समिती संचालक बाळासाहेब, नेटके साहेब, चंद्रकांत अंबारे, सरपंच राजू भोसले (राजुरी ), सरपंच अंकुश शिंदे (पोथरे), आबासाहेब अंबारे, नाना गोडगे, सरपंच शहाजी राऊत ( कोंढेज), अविनाश सरडे, उपसरपंच टिंकू सरडे (चिखलठाण), उपसरपंच तानाजी नीळ (गौडरे), सरपंच गणेश घोरपडे (वरकटने) आदिसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले.

माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्या भाषणातून  शेलगाव (क) येथे वीज कपातीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे सांगितले. उजनी – मराठवाडा बोगद्यातून शेलगाव (क) व इतर गावांना शेतीसाठी कायमस्वरूपी उचलपाणी परवाने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच  येथील श्री नागनाथ मंदिराच्या सभा मंडपासह सुविधा निर्माण करून तीर्थक्षेत्र विकास करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!