आदिनाथच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न
करमाळा : मकर संक्रातीच्या मुहूर्तावर आज (दि. १५) करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या साखर पोत्यांचे बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार नारायण पाटील, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, उपाध्यक्ष रमेश कांबळे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, संचालक डॉ. हरिदास केवारे, डॉ. वसंतराव पुंडे, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, बचाव समितीचे सर्व संचालक, सभासद व अधिकारी वर्ग उपस्थित होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या उत्पादित पाच साखरेच्या पोत्याचे पूजन करण्यात आले.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रो ऐवजी सभासदांच्याच मालकीचा राहावा या साठी आदिनाथ मंदिरात पहिली बैठक घेतली होती. संकल्प पूर्ती झाल्याने आदिनाथ साखर कारखान्यातून निर्माण झालेल्या पहिल्या साखरेच्या पोत्यातून संगोबा (ता.करमाळा) येथील आदिनाथ महाराजांच्या मंदिरात शिरा बनवून महाप्रसाद म्हणून बचाव समितीने काल (दि.१४) उपस्थित सर्वांना वाटण्यात आला.
आदिनाथच्या प्रत्येक सभासदांनी आपला 20 टक्के ऊस देऊन कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे –रामदास झोळ, अध्यक्ष,दत्तकला शिक्षण संस्था
आदिनाथ साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत, शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायण पाटील,रश्मी बागल, आदिनाथ बचाव समिती यांनी सहकार्य केल्यामुळे कारखाना चालू करु शकलो. ज्या शेतक-यांनी आदिनाथ कारखान्याला ऊस गळीतास दिला आहे त्या ऊसाचे पेमेंट व तोडणी वाहतूक तात्काळ देण्यात येत आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी आदिनाथला ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे
– धनंजय डोंगरे,चेअरमन ,आदिनाथ सहकारी साखर कारखाना