गायींच्या डोहाळे जेवण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – मोहोळ तालुक्यातील बोपले येथील उमाकांत चंद्रकांत वेदपाठक यांच्या घरी सुंदरी गायीचा डोहाळे जेवण्याचा कार्यक्रम दि.२८ रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून केम तालुका करमाळा येथील गो सेवक परमेश्वर तळेकर उपस्थित होते. या वेळी सुंदरी या गायीची सजावट केली होती. गाईच्या गळ्यात फुलाचे हार घातले होतें. शिंगाला हेंगुळ लावुन बेगडे बसवली होती. शिंगाला गोंडे बांधली पाठिवर रंगिबेरंगी साड्या टाकल्या पाच सुवासिनी तिची ओटी भरली. गाईच्या समोर फळे ठेवली व गायीची पूजा केली. त्यानंतर महिलांनी गाणी म्हटली. या नंतर गो सेवक परमेश्वर तळेकर यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “भारतीय शेतीचे सुत्र, देशी गाय शेणगोमुत्र” हा उद्देश उराशी बाळगून मी २८ देशी गाई पाळल्या आहेत. संपूर्ण माझे कुटुंब या गाईची सेवा करीत आहेत. भाकड गाय बैल शेतीसाठी किती काम करतो शेती व् त्यांच्या श्वास तून सुपिक बनवतो बैल जेवढा खातो तेवढा खत रूपाने आपल्याला परत कर तो शेती टिकवायची व पिकवायची असेल तर देशी गायी,बैल शिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकानी एक तर देशी गाय पाळावी.8

या नंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ याना भोजनाची सोय केली होती या कार्यक्रमाची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.


