भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील निवडीबद्दल ताकमोगे व सिंधी यांचा केम येथे सत्कार - Saptahik Sandesh

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीतील निवडीबद्दल ताकमोगे व सिंधी यांचा केम येथे सत्कार


केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – सोलापूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱी यांच्या १५ सप्टेंबर रोजी निवडी झाल्या आहेत. यात जिल्हाकार्यकारिणीच्या सदस्य पदी निवड झालेले केम येथील धनंजय ताकमोगे व जिल्हा चिटणीसपदी निवडलेले शाम सिंधी यांचा त्यांच्या निवडीबद्दल केम भाजप वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपची पश्चिम जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर – करमाळा तालुक्यातील अनेकांचा समावेश

धनंजय ताकमोगे हे भारतीय जनता पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. या अगोदर त्यानी भाजप युवा मोर्चाची तालुक्याची जबाबदारी पार पाडली त्यांच्या निवडीबद्दल केम भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी नूतन जिल्हा चिटणीस शाम सिंधी यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी शहराध्यक्ष गणेश तळेकर होते या प्रसंगी नूतन सदस्य पदी निवड झालेले धनंजय ताकमोगे म्हणाले माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी पक्षाने निवड केली आहे याचे मी सोन करून दाखवेन मी ग्रामीण भागात पक्ष वाढविण्यासाठी रात्र,दिवस काम करीन केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागात घरा,घरा पर्यंत पोहचविण्याचे काम करीन.

या वेळी भाजप युवा मोर्चा माजी तालुका उपाध्यक्ष रघुनाथ सावंत ऊत्तरेश्वर कामटे, राहुल रामदासी, संजय गांधी निराधार योजना सदस्य नरेंद्र ठाकुर तसेच नागेश तळेकर,अक्षय गोडसे अशोक केंगार विकास कळसाईत, बापू वेदपाठक , शंकर तळेकर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर युवा मोर्चा उपाध्यक्ष सागर नागटिळक हर्षद गाडे युवा सेनेचे समन्वयक सागर राजे तळेकर , सचिन श्रृंगारे आदि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!