भाजपची पश्चिम जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर - करमाळा तालुक्यातील अनेकांचा समावेश - Saptahik Sandesh

भाजपची पश्चिम जिल्ह्याची नवी कार्यकारिणी जाहीर – करमाळा तालुक्यातील अनेकांचा समावेश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण भागाच्या भाजपची नवी कार्यकारणी टीम काल (दि.१५) जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार जिल्ह्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी तसेच जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे चेतनसिंह यांनी सांगितले. या नव्या कार्यकारिणीमध्ये करमाळा तालुक्यातील खालील व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला आहे.

  • सरचिटणीस – गणेश नागनाथ चिवटे करमाळा,
  • युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष – शंभूराजे जयवंतराव जगताप करमाळा,
  • जिल्हा उपाध्यक्ष – शशिकांत पवार, करमाळा, अफसर सुरेश जाधव,करमाळा
  • चिटणीस – विनोद महारनवर,करमाळा, शाम सिंधी करमाळा, भाग्यश्री दिवाकर कुलकर्णी करमाळा, लक्ष्मण केंकान करमाळा.
  • जिल्हा कार्यकारणी सदस्य :- करमाळा – अशोक धोंडीबा ढेरे, श्री धनंजय हरिभाऊ ताकमोगे, श्री अमोल तुकाराम जरांडे, श्री विठ्ठलराव नारायण शिंदे, श्री हरिभाऊ झिंजाडे, श्री संदीपान गोरख कानगुडे, श्री बापूसाहेब वामन तनपुरे, सौ. रुपाली सागर ननवरे सौ. वनिता शिवाजी साळुंखे, सौ. चंपावती विलास कांबळे, सौ. सुमन नाळे, सौ. नीता घाडगे, सौ. कोमल वाघ, सौ. जयश्री वाघमारे, सौ शांता खाडे

याबरोबरच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विविध ज्येष्ठ व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलेले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासारख्या व्यक्तीं सोबतच करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांचे नाव देखील निमंत्रित सदस्य म्हणून समावेश केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!