केम-भोगेवाडी जुन्या रस्त्याची दुरवस्था-रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी


केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम-भोगेवाडी जुन्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे हा रस्ता त्वरीत करावा असी मागणी भोगे वाडी ता.माढा येथील पोलिस पाटील सुरेश पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की केम- भोगेवाडी हा जुना रस्ता आहे याचे अंतर चार किलोमीटर आहे. केम भोगे वाडी रस्ता बिचितकर वस्ती ते भोगे वाडी या रस्त्यावरील संपूर्ण खडी उघडी पडली आहे. या रस्त्यावरून गाडया चालवताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून गाडया चालवाव्या लागतात. तसेच हा रस्ता काय खडयात रस्ता हे समजत नाही. भोगे वाडी येथील येथील नागरिकांचे केम गावावर आवक जावक अवलंबून त्यामुळे नागरिकांना केम येथे बाजार व दवाखान्यासाठी ये जा करावी लागती. रात्री अपरात्री या रस्त्यावरून गाडया चालवताना मोटार सायकल ली घसरून लहान मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना या रस्त्यावरून पायी सुध्दा नीट चालता येत नाही आणी विशेष म्हणजे हा रस्ता पटाडाच्या शिवरातून जात असल्याने ऊंचावर आहे त्यामुळे या रस्त्याच्या जेष्ठ नागरिक विद्यार्थी,यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच केम येथील प्रवाशांना कुर्डूवाडी जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या रस्यावर मोटार सायकल , टेंपो यांची वर्दळ असते भोगेवाडी सारख्या सैन्याच्या गावाला रस्त्याची दुरवस्था झाली आहे लोकप्रतिनिधिंनी या कडे लक्ष देण्याची गरज आहे. देश सेवेसाठी येथील प्रत्येक घरातील एक सैनिक देश सेवा करीत आहे अशा गावाकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!