जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत केमच्या विद्यार्थीनी प्रथम – विभागीय स्पर्धेसाठी निवड
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : पंढरपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत केम येथील सिद्धी सचिन तळेकर व प्रिया पप्पू चेंडगे या खेळाडूंनी थाळीफेक या खेळात वेगवेगळ्या गटात प्रथम क्रमांक मिळवीला. त्यानंतर त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दोन्ही विद्यार्थिनी केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयात शिकत असून स्वराज्य रक्षक मर्दानी खेळाचे देखील ते खेळाडू आहेत.सिद्धी सचिन तळेकर हिने १७ वर्षे वयोगटात २२.७० मीटर थाळीफेक करत प्रथम क्रमांक मिळविला.प्रिया पप्पू चेंडगे हिने १४ वर्षे वयोगटात २०.१८ मीटर थाळीफेक करत प्रथम क्रमांक मिळविला.
या विद्यार्थिनींना केम येथील स्वराज्य रक्षक मर्दानी खेळाचे प्रशिक्षक अक्षय तळेकर यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी खेळाडूंचा करकंब (ता.पंढरपूर) येथील शिवरत्न मर्दानी आखाडा यांच्या वतीने स्नेह दिप व्यवहारे यांच्या मर्दानी खेळाचे टिमच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या यशस्वी खेळाडूंचे राजाभाऊ तळेकर विद्यालयाच्या संस्थेचे उपाध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक विनोद तळेकर, शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर मुख्याध्यापक नागनाथ तळेकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले. तसेच केम परिसरातून देखील त्यांचे कौतुक केले जात आहे.