केडगाव शासकीय कुष्ठधामसाठी 3 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर - आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

केडगाव शासकीय कुष्ठधामसाठी 3 कोटी 40 लाख रुपये निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केडगाव (ता.करमाळा) येथील शासकीय कुष्ठधाम करीता जिल्हा नियोजन समिती 2022 -23 जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून सुधारणा करण्याकरिता आपण 3 कोटी 50 लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली होती, त्यानुसार 8 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम करीता 3 कोटी 40 लाख 92 रुपयाची प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे किचन कट्टा, भोजन हॉल व ऑफिस बांधण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ सन 2022 – 23 महिला व बालविकास विभागाकडून (राखीव 3 टक्के निधीतून ) सदर निधी मंजूर झालेला आहे.
या निधी मधून केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे असलेल्या रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!