करमाळा शहरातील ३० वर्षाच्या युवकाचे निधन... - Saptahik Sandesh

करमाळा शहरातील ३० वर्षाच्या युवकाचे निधन…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील किल्ला विभाग येथील रहिवासी व होमगार्ड मध्ये सध्या कार्यरत असलेला तरुण युवक सचिन मारुती ननवरे (वय 30) याचे आज (ता.21) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान हृदयविकाराने निधन झाले आहे.

त्याच्या पश्चात एक भाऊजई व पुतणी असा परिवार आहे, सचिन ननवरे हा करमाळा शहरातील किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळ व शिवराज्य प्रतिष्ठानचे सदस्य म्हणून होते. एका तरुण युवकाचे व कठीण प्रसंगातून सध्या पोलिसांसोबत होमगार्ड म्हणून काम करत असल्याने किल्ला विभागातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!