जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये 'Student Led Conference' चे आयोजन.. - Saptahik Sandesh

जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल मध्ये ‘Student Led Conference’ चे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : झरे (ता.करमाळा) येथील भैरवनाथ प्रतिष्ठान करमाळा संचालित जयप्रकाश बिले पब्लीक स्कूलमध्ये (SLC) Student Led Conference एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ज्योती मूथा, राजकुवर पाटील, ज्योती कुलकर्णी,रजनी साळुंखे आणि स्वाती लुंकड आधी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता शाळेमध्ये झाली.

या उपक्रमामध्ये सर्व मुलांनी आपआपले विषय पालकांसमोर व शिक्षकांसमोर सादर केले. या उपक्रमामध्ये सर्व मुलांनी भाग घेतला होता. या उपक्रम राबवण्याचा हेतू हा मुलांचे स्टेज डेरिंग वाढणे हा होता.

यामुळे मुलांच्या विविध कलागुणांना वाव मिळालेला दिसला. पालकांकडून मुलांवर्ती कौतुकाचा वर्षाव होताना दिसून आला. SLC घेण्याची संकल्पना ही शाळेच्या संचालिका डॉ.स्वाती बिले यांची होती. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व सहकारी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!