करमाळा शहराजवळ ट्रक अपघातात एक वृध्द जागीच ठार.. - Saptahik Sandesh

करमाळा शहराजवळ ट्रक अपघातात एक वृध्द जागीच ठार..

करमाळा संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२२) : करमाळा शहराजवळील करमाळा पुणे रोडवर तुकारामनगर समोर एका ट्रक चालकाने पायी चालणाऱ्या वृद्धास जोराची धडक दिली असून, या अपघातात वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाला आहे. हा अपघात आज (ता.22) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

मयत व्यक्तीचे नाव समजले नसून, घटनास्थळी पोलिसांनी जावून या मयत व्यक्तीस पुढील कार्यासाठी करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!