शेलगाव (वां) ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाची एकहाती सत्ता.. - Saptahik Sandesh

शेलगाव (वां) ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाची एकहाती सत्ता..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शेलगाव (वां) ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण आबा पाटील गटाची एकहाती सत्ता आली आहे.

अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत पाटील गटाच्या वतीने लता महादेव ठोंबरे तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार बागल गटाच्या युतीच्या वतीने सागरबाई शहाजी केकान यांच्यात लढत झाली या झालेल्या निवडणुकीत पाटील गटाच्या उमेदवार लता महादेव ठोंबरे यांना १४७० तर सागरबाई शहाजी केकान यांना ७३२ मते पडली व पाटील गटाच्या लता ताई ठोंबरे या ७३८ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या तर ११ सदस्य असलेल्या या तालुक्यातील बहुचर्चित निवडणुकीत पाटील गटाचे सर्व सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आले शेलगाव (वां) च्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण सदस्य व विक्रमी असे मताधिक्य सरपंच पदाच्या उमेदवारास मिळाले आहे.

या निवडणुकीत अमर दादा ठोंबरे यांच्या विकासकामांच्या जोरावर सर्वसामान्य लोकांनी मतदान केल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे नूतन ग्रामपंचायत सदस्य म्हणून मंगल प्रवीण पवळ, दत्तात्रय बाळकराम केकान, वसंत अजीनाथ केकान, भगवान गणपत पोळ, सुशीला भारत पोटे, दौलत सायबु पवार, मिरा आबासाहेब चींचकर, सावित्रा विठ्ठल कोंडलकर, समाधान विष्णू जाधव , वर्षा अमित केकान, पुष्पा धनंजय काटे, यांची निवड झाली सर्व नूतन सदस्यांचे मा.आ. मा.श्री.नारायण आबा पाटील व युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाले.शेवटी सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!