तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प. प्रा. घोटी शाळेची उल्लेखनीय कामगिरी

करमाळा:घोटी (ता.करमाळा) येथील PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध खेळ प्रकारांमध्ये उत्कृष्ट कौशल्य, शिस्त, संघभावना आणि जिद्द दाखवत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

खेळ प्रकारनिहाय निकाल :
कबड्डी
– मोठा गट (मुली): द्वितीय क्रमांक
खो-खो
– मोठा गट (मुली): प्रथम क्रमांक
– लहान गट (मुली): द्वितीय क्रमांक
लंगडी
– मोठा गट (मुले): प्रथम क्रमांक
– मोठा गट (मुली): प्रथम क्रमांक
धावणे
– लहान गट (१०० मी.): सई किशोर ननवरे – प्रथम क्रमांक
– लहान गट (२०० मी.): आदर्श अमोल डिकुळे – द्वितीय क्रमांक
बुद्धिबळ
– मोठा गट: शिवतेज अमोल भोसले – द्वितीय क्रमांक

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, पंचायत समिती करमाळाचे गटविकास अधिकारी कदम, तसेच गटशिक्षण अधिकारी नितीन कदम यांनी अभिनंदन केले. घोटी ग्रामपंचायतचे सरपंच विलास राऊत पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय जालिंदर म्हेत्रे व समिती सदस्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे विशेष कौतुक केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
या यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, पालक व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा विजय अधिक अर्थपूर्ण ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


