जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय विजेता

करमाळा: क्रीडा युवक सेवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर व सोलापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर रोजी राजीव गांधी इंडोर स्टेडियम सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळाच्या १९वर्षे वयोगट मुलींच्या संघाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकावले.

अंतिम फेरीमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने बलाढ्य अशा पंढरपूर च्या संघाला धुळ चारत ११ गुणांनी विजय मिळवले व यशस्वी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. प्रगती वायदंडे व साक्षी गोरे, ऐश्वर्या गोरे यांनी उत्कृष्ट खेळ करत हे यश खेचुन आणले.
या संघाला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व करमाळा तालुका क्रीडा समन्वयक रामकुमार काळे व करमाळा तालुका कबड्डी कोच नवनाथ माने, तालुक्यातील वरिष्ट क्रीडा शिक्षक बाळासाहेब भिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




