पोलीस पाटील पदाची निवड परीक्षा 17 डिसेंबरला-परीक्षा कुर्डूवाडीत होणार

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.2) : करमाळा तालुक्यातील तसेच कुर्डूवाडी उपविभागातील पोलीस पाटील निवडीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 17 डिसेंबरला कुर्डूवाडीत परीक्षा होणार आहे.
करमाळा तालुक्यातील वडगाव (उ),वडगाव (द), पिंपळवाडी, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावली, विहाळ, बिटरगाव (वां.),पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढारचिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव (ह)शेलगाव (क) व बोरगाव या ठिकाणी पोलीस पाटील पदाची निवड होणार आहे. त्यासाठी पुन्हा कार्यक्रम जाहीर केला तो पुढील प्रमाणे… 1 डिसेंबर ते 8 डिसेंबर अर्जाची चौकशी, 11डिसेंबर ला पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध होणार,12 ते 15 ओळखपत्र पाठवणार, ज्यांना मिळाले नाही, त्यांनी उपविभागीय कार्यालय,कुर्डूवाडी येथून प्राप्त करावीत.
17 डिसेंबर सकाळी 10 ते 12-30 या कालावधीत उपविभागीय कार्यालयात होणार आहे. पात्र उमेदवार यादी 20डिसेंबर, ला जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर 26 ते 29 डिसेंबर पर्यंत मुलाखती व कागदपत्राची छाननी केली जाणार आहे. तर 2 जानेवारी ला अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. असे पोलीस पाटील निवड समिती प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी जाहीर केले आहे.



