तहसील कर्मचाऱ्यांना घरचा आहेर-उशीरा येणार्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.12: तहसील कर्मचाऱ्यांना घरचा आहेर मिळाला असून उशीरा येणार्या पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून या कर्मचाऱ्यांचा निम्मा पगार कपात करण्याचा दंड केला आहे.
ही कारवाई तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केली आहे.
कार्यालयीन कर्मचारी वेळेवर येत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे ठोकडे यांनी स्वतःहून प्रत्येक टेबलची माहिती घेतली. त्यानुसार मंगळवारी तीन क्लार्क व दोन शिपाई उशीरा आल्याने त्यांच्यावर पगाराची कारवाई करण्यात आली आहे.
तहसीलदार यांनी स्वतःहून ही कारवाई केल्यानंतर कर्मचाऱ्यांवर दहशत बसली असून अता सर्व कर्मचारी वेळेवर हजर होत आहेत.