डाॅ.प्रचिती पुंडे यांना राष्ट्रीय बायोटेक सर्विस पुरस्काराने सन्मानित -

डाॅ.प्रचिती पुंडे यांना राष्ट्रीय बायोटेक सर्विस पुरस्काराने सन्मानित

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२०: येथील डाॅ.प्रचिती अक्षय पुंडे यांना त्यांच्या प्रोलक्स अॅप्सच्या निर्मिती बद्दल राष्ट्रीय बायोटेक सर्विस पुरस्कार-२०२३ ने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी सूक्ष्मजीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयातून शैक्षणिक, संशोधनात्मक,सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणा-या संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो. मायक्रोबायोलॉजी सोसायटीच्या निवड समितीने २०२३ सालच्या पुरस्कारासाठी डॉ.प्रचिती पुंडे यांची निवड केली होती.या पुरस्काराचे वितरण तामिळनाडूतील भारतीदासन विद्यापीठ तिरुचिरापल्ली येथे करण्यात आले.

सूक्ष्मजीव शास्त्रातील संशोधन, वर्तमानातील आव्हाने आणि भविष्यातील दृष्टिकोन या विषयावर मायक्रोबायोलॉजी सोसायटी आणि भारतीदासन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ ते ११ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन या ठिकाणी केले होते. सुवर्णपदक स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीदासन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एम सेलवम,सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरविंद देशमुख ,यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ तिरुवल्लूवर विद्यापीठ वेल्लोर तसेच व्हीआयटी विद्यापीठ भोपाळचे माजी कुलगुरू डॉक्टर पी.गुणशेखरन, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आसाम येथील विभागीय केंद्राचे संचालक प्राध्यापक डॉ. के.नटराजा श्रीनिवासन,यशकल्याणी संस्थेचे प्रा.गणेश करे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते देश विदेशातील सुमारे दोनशे शास्त्रज्ञांनी या मध्ये सहभाग नोंदवला.

डॉ.प्रचिती पुंडे या करमाळा शहरातील पुंडे हाॅस्पीटलमध्ये भूलतज्ञ म्हणून कार्यरत राहून, त्यांनी रूग्णसेवा करत पेशी,उर्जा,पेशीपटल, उर्जा संरचना आदि गोष्टींचा सुक्ष्म अभ्यास करत,त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत सुमारे २५ पुस्तकांचे लेखन केले. तसेच संशोधनपर कार्य उभे केले.या माहितीच्या उपयोजनातून त्यांनी प्रोलक्स वेलनेस प्रोडक्शन कंपनीची निर्मिती करत प्रोलक्स वेलनेस अॅप बनवले. त्या संशोधनाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ.प्रचिती पुंडे यांनी जीवशास्त्र आणि उर्जा या संबंधित अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले असून ते पेंटटने जतन केले आहेत अनेक रूग्णांना त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होतोय. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या भाषेत अवगत व्हावा यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले असून youtube च्या माध्यमातून त्यांनी आपला विषय तळागाळातील पोहोचवण्याचे कार्य केले आहे. कोरोनाच्या काळात वृत्तपत्र आकाशवाणी,विविध न्युज चॅनेल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीचे काम देखील केले आहे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि वर्तमान परिस्थिती तसेच नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मध्ये संशोधनाची उत्तरे जागृत करून त्यांच्या विचाराने कृतीला वाव देण्याचे कार्य त्या करत आहेत. या सर्व गोष्टींची दखल घेऊन डॉ.पुंडे यांना मायक्रोबायोलॉजी सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय बायोटेक सर्विस पुरस्कार देण्यात आला.

यावेळेस बोलताना मायक्रोबायोलॉजी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख म्हणाले मायक्रोबायोलॉजी सोसायटीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून देशभरात ,देशाबाहेर विविध उपक्रम राबविले जातात या विषयाशी संबंधित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे परिसंवाद तसेच व्याख्यानांचे आयोजन विविध स्पर्धा, संशोधनासाठी शिष्यवृत्ती, सामंजस करार ,सामाजिक उपक्रम आदि बरेच उपक्रम राबवले जातात शासन व विद्यापीठ पातळीवरील या विषयाशी संबंधित अनेक प्रश्न या सोसायटीच्या वतीने सोडविण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!